सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बेस्ट कर्मचा-यांच्या
सेवानिवृत्तीच्या रकमे पैकी 30 टक्के एवढया रकमेच्या प्रदानाबाबत.
सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक 10 मे, 2024 रोजीच्या
आदेशानुसार, पात्र असलेल्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीच्या
रकमेपैकी 30 टक्के एवढया रकमेच्या प्रदानाबाबत बेस्ट उपक्रम सूचित करीत आहे.
या सूचनेमध्ये सदर रक्कम प्रदान करण्याकरीताची कार्यपध्दती आणि देय
रकमेबाबतचे तपशील देण्यात आले आहेत.
- अंतरिम यादी 1
- अंतरिम यादी 2
ज्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या रकमेच्या 30 टक्के एवढी
रक्कम यापूर्वीच प्राप्त झाली आहे, अशा कर्मचा-यांनी प्रदानाबाबतची कृपया फक्त
नोंद घ्यावी.
ज्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे 30 टक्के प्रदान करणे बाकी आहे, अशा
कर्मचा-यांची यादी बेस्ट उपक्रमाच्या संकेत स्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे.
अशा कर्मचा-यांनी त्यांच्या प्रलंबित देयकांबाबत बेस्ट उपक्रमाकडे त्वरीत संपर्क
साधावा.