1873 |
बॉम्बे ट्रामवे कंपनी लि. ची सुरुवात. |
1874 |
घोडयाने हाकणारी ट्राम ची सुरुवात. |
1905 |
बॉम्बे इलेक्टिरक सप्लाय आणि ट्रामवे कंवनी लि. ची सुरुवात |
1907 |
प्रथम विजेवर चालणारी ट्राम ची सुरुवात |
1909 |
बीव्हर एकमजली बस ची सुरुवात. |
1912 |
एस.टी.टी. बस ची सुरुवात |
1920 |
दुमजली ट्राम ची सुरुवात |
1926 |
एकमजली बस सेवेची सुरुवात |
1934 |
बस सेवा शहराच्या उत्तरेकडील मागापर्यंत वाढविण्यात आली. |
1937 |
दुमजली बस सेवेची सुरुवात |
1940 |
कुलाबा आणि माहिम दरम्यान प्रथम मर्यादित बस सेवेची सुरुवात |
1947 |
बी.ई.एस. आणि टी.कं.लि.चे बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये विलीनीकरण |
1949 |
बस सेवेचा पश्चिम उपनगरा पर्यंत विस्तार आणि अमेरिकन कारची ओळख. |
1955 |
बस सेवेचा पूर्व उपनगरापर्यंत विस्तार आणि लक्झरी कोच सेवा सुरु. |
1962 |
ट्रॉली बस सेवेची सुरुवात |
1964 |
पोलीस कर्मचा-यांना मोफत प्रवास सुविधा देण्यात आली आणि ट्रॉम सेवा रद्द करण्यात आली |
1966 |
टाटा मर्सिडीज बेंजची बस सुरु झाली. |
1967 |
जोडबस (ट्रेलर) बस प्रवर्तनात आली. |
1968 |
पुर्णपणे अंध व्यक्तिंना सवलत भाडे सु॑विधा देण्यात आली व बीव्हर दुमजली बस सुरु केली. |
1970 |
कॉमेटाइटेड टायटन बसची ओळख. व चित्तह एकमजली बसची ओळख |
1971 |
ट्रॉली बस सेवा रदद् करण्यात आली. बसमध्ये महिलांसाठी आरक्षित आसनांची व्यवस्था सुरु केली. बांगलादेश मदत निधी सुरु केला. |
1972 |
महानगरपालीकेची रजत जयंती.टाटा एकमजली बसची सुरुवात |
1976 |
मुंबई उपनगरीय वाहतूक प्रकल्प कार्यान्वित. |
1981 |
मार्वे ते मनोरी पर्यंत फेरी सेवा सुरु केली. |
1984 |
बसकुपन पध्दत कार्यान्वित. मार्ग क्र.501 मर्या. सुरुकरुन नवी मुंबईपर्यंत बससेवेचा विस्तार./td>
|
1985 |
जोड बसेस प्रवर्तनातून काढुन टाकण्यात आली आणि बसकुपन पध्दत रद्द करण्यात आली. |
1986 |
मराठी तिकीटांची छपाई सुरु करण्यात आली. |
1990 |
मुंबई मध्ये राहणा-या स्वातंत्र्य सेनानींसाठी मोफत प्रवास सुविधा. |
1992 |
स्वयंचलित बस धुण्याचे यंत्र आगारांमध्ये स्थापित. |
1994 |
कनिष्ठ महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी बसभाडयामध्ये सवलत देण्यात आली मार्ग क्र.30 मर्या. सुरुकरुन ठाण्यापर्यंत बससेवेचा विस्तार. |
1996 |
एकमजली जोड व्हेस्टिबुल बस कार्यान्वित. |
1997 |
संपिडीत नैसर्गिक वायू इंजिनाने सुसज्ज पर्यावरणाला अनुकूल बस कार्यान्वित.महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या सहकार्याने प्रदीर्घ वारसा असलेली प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरिता छतविरहित दुमजली बस सुरु. निवडक मार्गावर मासिक बसपास योजनेची सुरुवात लक्झरी बस सेवा कार्यान्वित. |
1998 |
वातानुकुलीत बस सेवा सुरु केली. शिवाजी नगर बस आगार कार्यान्वित. संपर्क कमी कार्ड (स्मार्ट कार्ड) च्या मदतीने स्वयंचलित भाडे संकलन कार्यान्वित. |
1999 |
मुलुंड बस आगार कार्यान्वित. मासिक बसपास योजना बंद. |
2000 |
दिनांक 1.12.2000 पासून सर्व लक्झरी बसगाडया बंद करण्यात आल्या. |
2003 |
प्रायोगिक तत्वावर निम्नतळ (लो Óलोअर) बस कार्यान्वित. |
2004 |
मुंबई – सिएसटी ते मंत्रालय पर्यंत (अंदाजे 3.5 कि.मी.) बसगाडयांसाठी स्वतंत्र बस मार्गिका |
2010 |
आरएफआयडी आधारित स्मार्ट कार्ड बस पास योजना कार्यान्वित. |
2011 |
सर्व बसगाडयांमध्ये इलेक्ट्रॉनिक तिकिट देण्याचे मशिन (इ.टी.आय.एम) कार्यान्वित. |
2014 |
दिनांक 14.04.2014 पासून मालाड बस आगार कार्यान्वित. |
2016 |
दिनांक 01.02.2016 पासून काळाकिल्ला बस आगार कार्यान्वित. |