माननीय संपादक / वृत्त संपादक
बेस्ट उपक्रमाच्या अद्ययावत ' बस नियंत्रण कक्षाचा ' उद्घाटन सोहळा आज आज शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते दृकश्राव्य माध्यमाद्वारे पार पडला. यावेळी वडाळा आगारामध्ये महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरीताई पेडणेकर, स्थानिक आमदार श्री. सदा सरवणकर, बेस्ट समिती अध्यक्ष श्री.प्रविण शिंदे, बेस्ट समिती सदस्य सर्वश्री. आशीष चेंबुरकर , अनिल कोकीळ आणि बबन कनावजे तसेच स्थानिक नगरसेवक श्री. अमेय घो े , नगरसेविका श्रीमती उर्मिला पांचाळ, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेन्द्रकुमार बागडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते. मुंबई मनपा आयुक्त श्री. इ.सिं. चहल आणि बेस्ट समिती सदस्य श्री. राजेश ठक्कर हे दृकश्राव्य माध्यमाद्वारे सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कृपय , आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात सदर वृत्ताला प्रसिद्धी द्यावी ही विनंती .
( मनोज वराडे )
उप. जनता संपर्क अधिकारी
बेस्ट उपक्रम