बेस्ट उपक्रमाच्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या वतीने दिनांक २६ जाने वारी २०२० रोजी कुलाबा मुख्यालय येथे भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला . त्या निमित्ताने माननीय अध्यक्ष , बेस्ट समिती श्री. अनिल पाटणकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी बेस्ट उपक्रमाचे महा व्यवस्थापक श्री. सुरेंद्र कुमार बागड़े तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.