गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट २०१९ रोजी, सकाळी ८.१५ वाजता, भारताच्या ७३व्या स्वतंत्र दिनानिमित, बेस्ट उपक्रमाच्या सुरक्षा व दक्षता विभागातर्फे, उपक्रमाच्या कुलाबा आगार येथे ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभप्रसंगी बेस्ट समिती अध्यक्ष मा. श्री. अनिल पाटणकर
यांच्या हस्ते राष्टध्वजास मानवंदना देण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे,सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य) श्री संजय खाचने,सहाय्यक महाव्यवस्थापक(वि. पु) श्री महेंद्र उरुणकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (विधी) श्री राजेंद्र डुबल ,उपमुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री विजय सोनावणे व उपक्रमाचे कर्मचारी/ वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.