बेस्ट उपक्रमाच्या सुरक्षा व दक्षता विभागातर्फे ,७१ व्या भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन ध्वजारोहण समारंभ ,आज बुधवार, दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ०८.१५ वाजता इलेक्ट्रिक हाउस, कुलाबा आगार येथील मुख्य कार्यालय आवारात बेस्ट समितीचे अध्यक्ष मान. श्री आशिष चेंबूरकर यांच्या हस्ते साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास बेस्ट समिती सदस्य श्री राजेश कुसळे, श्री अनिल पाटणकर ,बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक श्री सुरेंद्रकुमार बागडे,भा.प्र. से. उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी बेस्ट उपक्रमाचे उप महाव्यवस्थापक श्री आर. जे. सिंग,सहाय्यक महाव्यवस्थापक श्री सुरेश पवार,श्री संजय खाचने,श्री राजेंद्र डूबल, बेस्ट उपक्रमाचे उप मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री विजय सोनावणे तसेच बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेस्ट समिती अध्यक्ष व महाव्यवस्थापक यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली व भारतीय स्वातंत्र्याच्या शुभेच्छा सर्व बेस्ट प्रवासी,वीज ग्राहक व कर्मचारी यांना दिल्या.