बसमार्ग जालव्यूह
बेस्ट उपक्रमाकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि तसेच नवी मुंबई, ठाणे आणि मिरारोड/भाईदर क्षेत्रामध्ये बस परिवहन सेवा पुरविण्यात येते. ३८०० पर्यावरणस्नेही बसगाड्यांच्या मदतीने ५०५ बसमार्गावर प्रवर्तन करुन ६३,७०० फे-यांमार्फत दैनंदिन सरासरी २.९ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. सदर बसगाड्यांचे प्रति दिन अदमासे ६.४२ लाख कि.मी. अंतर प्रवर्तित होते. सदर संपूर्ण प्रवर्तन २७ बसआगार, ५१ बसस्थानके आणि ११२ गंतव्यस्थानक/ चौकीमार्फत करण्यात येते.