दिनांक २६/१ /२०१८ रोजी स्वतंत्र भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन सोहळा बेस्ट समिती अध्यक्ष श्री अनिल कोकीळ यांच्या शुभहस्ते बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा आगार येथे सकाळी ८.१५ वाजता पार पडला. सदरचा प्रजासत्ताक दिन सोहळा बेस्ट उपक्रमाच्या सुरक्षा व दक्षता विभागातर्फे आयोजित केला जातो.
सदरच्या ध्वजारोहण समारंभ सोहळा बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक माननीय श्री. सुरेंद्रकुमार बागडे , भा.प्र.से. यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच कार्यक्रम प्रसंगी उप महाव्यवस्थापक (विद्युत पुरवठा ) , श्री, आर .जे. सिंग , सहा. महाव्यवस्थापक ( अभियांत्रिकी ) श्री. सुरेश पवार, उपमुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी (वरिष्ठ ), श्री विजय सोनावणे व बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.