![]() |
|
इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा |
आज शुक्रवार , दिनांक १० नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ४.३0 वाजता बेस्ट उपक्रमामार्फत इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा वडाळा आगार येथे मुंबईचे महापौर माननीय श्री विश्वनाथ महाडेश्वर यांच्या शुभहस्ते व युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून सर्वश्री रमेश कोरगांवकर, अध्यक्ष, स्थापत्य समिती, अनिल कोकीळ, अध्यक्ष, बेस्ट समिती, यशवंत जाधव, सभागृह नेता, प्रल्हाद ठोंबरे, अध्यक्ष, प्रभाग समिती, राजेश कुसळे, सदस्य, बेस्ट समिती, सुहास सामंत, सदस्य, बेस्ट समिती, अतुल शहा, सदस्य, बेस्ट समिती, अनंत नर, नगरसेवक, अमेय घोले, नगरसेवक, सर्वश्रीमती हेमांगी वरळीकर, उप महापौर, श्रद्धा जाधव, माजी महापौर, स्नेहल आंबेकर,माजी महापौर, श्री यशोधर फणसे, माजी अध्यक्ष स्थायी समिती, डॉ सुरेंद्रकुमार बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.